गर्वहरण
एकदा अर्जूनाला अापल्या महालातील कोलाहलाचा खूप कंटाळा येतो. एकांतवास मिळावा म्हणून तो गजबजलेल्या नगरापासून दूर एका निर्जन जंगलात निघून जातो. उन्हाळ्याचे दिवस असतात. त्यामुळे वातावरणात उकाडा असतो. उकाडा दूर करण्यासाठी अर्जून एका झाडाची फांदी तोडण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात एक छोटासा सूर्यपक्षी त्याच्या खांद्यावर येवून बसतो. तो चिमुकला पक्षी पक्षी अर्जूनाला विनंती करतो, " हे सर्वश्रेष्ठ धनुर्धरा ! कृपाकरून या झाडाची फांदी तोडू नकोस. या झाडावर अामची घरटी अाहेत. अाणि त्यामध्ये अामची छोटीछोटी पिलं अाहेत.तुम्ही जर फांदी तोडाल तर अामची पिलं मरतील. तेव्हा अामच्यावर दया करा. भविष्यात मी अापणास मदत करण्याचे अाश्वासन देतो." अर्जून त्याचे म्हणने ऐकतो व तेथून निघून जातो. दुसर्या झाडाची फांदी तोडत असतांना एक मुंगी त्याच्या हातावर चढते अाणि त्याला विनंती करते ," हे कौंतेय ! या झाडाची फांदी कृपाकरून तोडू नका. येथे अामची असंख्य घरे ...